निर्धार योग प्रबोधिनीतर्फे ‘सन्मान योग साधकांचा’ कार्यक्रम उत्साहात (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 06 23 at 22.10.30

जळगाव प्रतिनिधी । जागतिक योग दिन आणि निर्धार योग प्रबोधिनीच्या वर्धापनी दिनानिमित्त रविवार 23 जून रोजी कांताई सभागृहात ‘सन्मान योग साधकांचा’ कार्यक्रमात योगाबाबत प्रसार प्रचार आणि निस्वार्थ सेवा देणाऱ्या साधकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नाशिकचे कपिकुल सिध्दपीठम पिठाधिश्वर सदगुरू श्रीवेणाभारती महाराज यांच्याहस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख श्री. भरतदादा अमळकर यांची उपस्थिती होती.

अंतरराष्ट्रीय योग दिवस आणि निर्धार योग व क्रीडा प्रबोधिनीच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘सन्मान योग साधकांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक जे योग साधक आणि योग शिक्षक अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने योग सेवा देत आहे, अशा साधकांचा स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. दरम्यान ‘सन्मान योग साधकांचा’ हा आगळावेगळा कार्यक्रम जिल्ह्यात प्रथम घेतला जात असल्याने या कार्यक्रमाला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

यांना मिळाला पुरस्कार
गणपत यशवंत रत्नपारखी, नारायणदास जाखेटे, इंद्रराव पाटील आणि निलांबरी जावळे यांना योग जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. बळीराम सखाराम कुंभार, हर्ष नटवरलाल चौबे, दिपा कोल्हे, जगन्नाथ धर्मा जाधव, प्रतिभा कोकंदे, अरूणा पाटील, देवेंद्र अरूण काळे यांनी आपल्याला झालेल्या आजारावर योगाच्या माध्यमातून मात केली यांना उत्कृष्ट योग साधक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर शंकरराव झोपे, रविंद्र मधुकर माळी, डॉ. चंदर रतनमल मंगलानी, सुनिल गुरव, प्रा. अविनाश एस. कुमावत यांना उत्कृष्ट योग शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरूवात राजेश जोशी यांनी शंखनाद करून कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर पल्लवी उपासना आणि सोनाली पाटील यांनी त्रिवार ओंकार, गुरूवंदना करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्ष स्मिता पिल्ले यांनी आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून दिला.

निवड समितीचा सत्कार
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव कृणाल महाजन यांनी केली. पुरस्कार देण्यासाठी निवड समितीच्या सदस्य आरती गोरे, हेमंगिनी सोनवणे, डॉ. भावना चौधरी आणि चित्रा महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्याहस्ते पुरस्कारचे वितरण करण्यात आले. आभार स्मिता पिल्ले यांनी मानले. भूमिका कानडे यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Protected Content