भुसावळात विश्‍वकर्मा सुतार समाजाच्या सभागृहाचे भूमिपूजन

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मीनारायण नगरात विश्‍वकर्मा सुतार समाजाच्या सभागृहाचे भूमिपुजन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.

लक्ष्मीनारायण नगरात श्री विश्‍वकर्मा सुतार समाजाचे सर्वे नं ६७ येथील स्थानिक विकास कार्यक्रम २०१८-२०१९ येते सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी नगरसेवक किरण कोलते, नगरसेवक किशोर पाटील यांच्यासह समाजातील ज्येष्ठ मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content