आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे मराठी नववर्षानिमित्ताने शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये आरोग्य तपसणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मराठी नववर्षानिमित्त अखिल भारतीय लेवा युवक महासंघाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. धिरज पाटील व आर्या ऍडव्हान्स ओडोंटो केयरच्या संचालिका डॉ. रिना पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा दोनशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. यात प्रभागातील महिलावर्ग तसेच ज्येष्ठ नागरीकांची मोठ्या प्रमाणत सहभाग घेतला. श्री रिदयम हॉस्पिटल तर्फे डॉ. कुशल पाटील, डॉ. मनीष रगडे यांनी शिबिरात ६९ जणांची मधुमेह, रक्तदाब व प्राथमिक तपासणी केली. डॉ. सुनील मेश्राम यांनी नेत्रम हॉस्पिटलतर्फे ८९ रुग्णांनी नेत्र तपासणी केली, त्यात २४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ६५ नागरिकांनी दंत तपासणी केली. अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश वारके, प्रदेशाध्यक्ष चेतन पाटील, शहर सचिव सचिन पाटील, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल चौधरी, प्रवीण भोळे, सतीश सपकाळे, विशाल ठोके, विशाल जंगले, अनिकेत पाटील, जितेंद्र सपकाळे, बबलू बऱ्हाटे, उदय बोंडे, पितांबर पाटील, चंद्रशेखर पाटील, राहुल फालक, यश फालक, गणेश पाटील, पवन बाकशे, कपिल भिरुड उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अमित जावरे, संदीप भोई, कैलास पाटील, अमोल पाटील, सागर वाघोदे, लोकेश वाणी, धनेश पाटील, गिरीष राणे, विशाल सपकाळे, पवन ढंढोरे, निलेश कोळी आदींनी कामकाज पहिले.

Protected Content