सध्यस्थितीत जिल्हा टँकरमुक्त

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यातील विविध लहान मोठ्या सिंचन प्रकल्पात यावर्षी सरासरी ५७.१५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी ४९.७० टक्के जलसाठा होता. गेल्या चार पाच वर्षापूर्वी गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार आदी योजनांची अंमलबजावणी तसेच गेल्या दोन तीन वर्षापासून सरासरीपेक्षा एक ते दीडपट पर्जन्यमानामुळे वर्षी जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने जिल्हा टँकरमुक्त आहे.

सध्यस्थितीत जिल्ह्यातील तापमान ४४ अंश पर्यंत असून अजून दोन ते तीन महिने तापमानात वाढ होऊ शकते. वाढत्या उन्हामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन तसेच पाणीपुरवठा योजना आणि शेतीसिंचनासाठी आवर्तन सोडल्यामुळे पाणीसाठ्यात घट होत आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पापैकी हतनूर प्रकल्पात ६५.९६ आणि वाघुर ८४.७१असा उपयुक्त जलसाठा आहे तर गिरणा प्रकल्पात ४७.२४ टक्के जलसाठा आहे.
या प्रकल्पापैकी गिरणा प्रकल्पावर ५ते७ तालुक्यांसह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. गिरणा प्रकल्पातून आतापर्यत तीन आवर्तने सोडण्यात आलेली असून डावा कालव्याद्वारे १०० क्युसेक पाणी प्रवाहित असून अजून दोन आवर्तन आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा आरक्षित आहे. तर अन्य मध्यम प्रकल्पापैकी मन्याड ३६.३८, बोरी ३८, भोकरबारी ३८.४०, अग्नावती ३८.६१, हिवरा ३७.०८, बहुळा ५५.०६ अशी स्थिती आहे. तर तोंडापूर ५७.१७, सुकी ६८.५४, अभोरा ६९.७९, मंगरूळ ५५.७८, मोर ७३.५९, अंजनी ६० आणि गुळ ६०.९२ अशी स्थिती आहे.

टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून तयारी

असे असले तरी, यावर्षी ऊन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता, गाव-वाडय़ां पातळीवरील नळ योजना पूर्ण करणे, नवीन विंधन विहिरी, विहिरींची खोली वाढविणे, खासगी विहिरींचे अधिग्रहणासह ज्याठिकाणी पाणीपुरवठा पर्याय नाही अशा गाव-वाडय़ांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आली केली आहे.

गेल्यावर्षीपेक्षा यावेळी बऱ्यापैकी जलसाठा
जिल्ह्यात गेल्यावर्षी मोठ्या प्रकल्पात ५५.४१ टक्के तर मध्यम प्रकल्पात ४९.७० टक्के असा उपयुक्त जलसाठा होता. त्यामानाने यावर्षी उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण बऱ्यापैकी असून मोठ्या प्रकल्पात ६१.३१ सह मध्यम प्रकल्पात ५७.१५ टक्के असा आहे.

 

Protected Content