कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर सलीम मन्यार (वय-२१) रा. शिरपूर ता.धुळे हा तरुण कामाच्या निमित्ताने २५ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नशिराबादकडून जळगावकडे दुचाकी (एमएच १९, सीए २६१७) ने येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवर समोर भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक (एमएच १२, एसएल ७२४२) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार समीर मन्यार हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. सात दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून (एमएच १२, एसएल ७२४२) वरील कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.

Protected Content