फोटोग्राफी क्षेत्रात ज्ञान आणि त्याची योग्य सांगड घालून आपले वेगळेपण दाखवावे ; राहुल रनाळकर

 

IMG 5882 1

जळगाव, प्रतिनिधी | प्रत्येकाला प्रत्येक क्षणी स्वःताला सिद्ध करावे लागते. फोटोग्राफी क्षेत्रात देखील असलेले ज्ञान आणि त्याची योग्य सांगड घालून आपले वेगळेपण दाखवावे लागते.या क्षेत्रात स्पर्धा आहे पण स्पर्धा सगळीकडेच आहे या स्पर्धेत जोड धंदा देखील केला पाहिजे त्यामुळे आपली आवड आणि व्यवसाय यांची गट्टी होईल असे सकाळचे संपादक राहुल रनाळकर यांनी जागतिक फोटोग्राफी दिनाचे ओचीत्य साधून जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग मु.जे.महाविद्यालय व फोटो ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित फोटोग्राफर सन्मान सोहळ्यात त्यांनी आपले विचार मांडले.

यावेळी मंचावर चिराग पाटील(आर्ट ऑफ लिविंग फौंडेशन),संदीप पाटील(फोटो ब्रदर्सचे संचालक),प्राचार्य उदय कुलकर्णी, जनसंवाद व पत्रकारिता विभागप्रमुख प्रा.संदीप केदार उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका व प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी प्रशांत सोनावणे ,केतकी सोनार, चेतन पाटील, अपूर्वा वाणी, आकाश धुमाळ , चेतन पाटील यांची परिश्रम घेतले.आभार प्रा.संदीप केदार यांनी मानले .

यांचा झाला सन्मान :दैनिक लोकमत सचिन पाटील, दैनिक लोकमत गोकुळ सोनार ,दैनिक दिव्य मराठी आबा मकासरे, दैनिक सकाळ संदिपाल वानखेडे, दैनिक महाराष्ट्र टाइम्स प्रेम लिंगायत, दैनिक देशदूत योगेश चौधरी, लाईव्ह ट्रेड न्यूज वसीम खान,दैनिक देशोन्नती यांनी दैनिक साईमत भूषण हंसकर , दैनिक तरुण भारत रोशन पवार, ज्येष्ठ छायाचित्रकार पांडुरंग महाले, सतीश जगताप, सुरेश सानप ,लता मोतीराम आणि पोलीस विभागातील कार्य छायाचित्रकार जयंत चौधरी, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील छायाचित्रकार शैलेश पाटील ,जैन उद्योग समूहातील राजू हरिमकर, योगेश संदांशिव ,राहुल पाटील ,मूजे महाविद्यालयातील फोटोग्राफर दिलीप कोळी, राहुल इंगळे, नितीन थोरात, राहुल पाटील ,बबलू थोरवे ,योगेश सूर्यवंशी ,योगेश ठाकूर ,रोशन ठाकूर ,शिरीष पाटील ,दैनिक सकाळचे दीपक पाटील ,सुष्मिता भालेराव ,रुपेश महाजन, विवेक खानकरी

Protected Content