Home धर्म-समाज रस्त्यावरच्या खड्डयाला फांदीचा आधार ! : वाहनधारक बेजार

रस्त्यावरच्या खड्डयाला फांदीचा आधार ! : वाहनधारक बेजार

0
38

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्याच्या मध्यभागी भला मोठा खड्डा पडला असून याबाबत इशारा देण्यासाठी कुणी तरी यात फांदी रोवल्याचे आज दिसून आले आहे.

 

येथून जवळच असलेल्या जुने मुक्ताबाई ते चांगदेव महाराज मंदिर जाण्याच्या मार्गावर रस्त्यामध्ये भला मोठा खड्डा पडलेला आहे. त्यातच आज एकादशी असून खूप प्रमाणात भाविक मुक्ताईनगर मध्ये दाखल झालेले असताना त्यांना येण्या-जाण्यास त्रास होत आहे. यामुळे यावर कुणी तरी जुगाड पध्दतीचा उपाय शोधून काढला आहे.

 

सदर रस्त्यावर हा भला मोठा खड्डा पडून जवळपास एक महिना झालेला असताना असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे चक्क दुर्लक्ष होत आहे. यामुळे आज कुणी तरी वाहनधारकांना खड्डयाचा इशारा मिळावा म्हणून त्यात चक्क एक झाडाची फांदी रोल्या मुळे दिल्यामुळे येना जाणार्‍यांना झाडांमुळे लक्ष वेधले जात आहे. यामुळे त्यांना खड्डयाची सूचना मिळत आहे. तर याच फांदीमुळे अनेक वाहनधारकांना येथे नेमके काय आहे ? याची जाणीव होत नसून ते संभ्रमात पडत आहेत. यामुळे हा खड्डा त्वरीत बुजविण्यात यावा अशी मागणी होत आहे.


Protected Content

Play sound