Home क्राईम चोपड्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीवर पोलिसांचा छापा; १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !

चोपड्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीवर पोलिसांचा छापा; १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !

0
9

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील मोठा भोईवाडा परिसरात प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १३ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मोठा भोईवाडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी फिरोज बेग इसहाक बेग (वय ४२, रा. मोठा भोईवाडा, चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान विमल पानमसाला (हिरवे, निळे व पिवळे पाऊच) तसेच तंबाखूजन्य पदार्थांची एकूण ६८ पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मालाची किंमत १३,६२४ रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक २९७/२०२६ दाखल करण्यात आला असून, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.


Protected Content

Play sound