सट्टा जुगारावर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा दाखल

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरातील अर्बन बँकेसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या सट्टा जुगारावर पोलिसांनी कारवाई करत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही धडक कारवाई १९ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता करण्यात आली.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, हर्षल पाटील यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छापा टाकून जिजाबराव भिका पाटील (रा. तांबेपुरा), विकी सुंदरदास बठेजा (रा. सिंधी कॉलनी), संतोष मधुकर बनसोडे (रा. गांधलीपुरा) या तिघांना सट्टा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.

त्यांच्याकडून सट्टा जुगारासंबंधी साहित्य आणि १२६० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या तिघांविरोधात जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईनंतर संबंधित परिसरात गस्त वाढवली असून सट्टा जुगाराचे सत्र उघडकीस येत असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येच जुगार सुरू असल्याचे उघड झाल्याने संतप्त नागरिकांनी अशा दुकानांवर कारवाई करत जागा जप्त करण्याची मागणी केली आहे.

Protected Content