जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा भागातील सोमानी मार्केटमध्ये जुगार अड्ड्यावर रामानंद नगर पोलीसांनी रात्री छापा टाकून सुमारे २८ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार झाले आहे. रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांना पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमध्ये आनंद शिंदे यांच्या दुकानात सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप परदेशी, संदीप महाजन, हेडकॉन्स्टेबल रविंद्र मोरे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळतांना स्वप्निल शिंदे याच्यासह मेहमुद कमरोद्दीन पिंजारी (मास्टर कॉलनी अशोक किराणाजवळ जळगाव), प्रविण प्रभाकर पाटील (गर्जना चौक पिंप्राळा), समाधान पंढरीनाथ चौधरी (गणपती नगर पिंप्राळा) यांना ताब्यात घेतले आहे. सिपीयु, मॉनीटर, स्पिकर, माऊस आदी साहित्य, रोख ८७० रुपये असा एकुण २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल रविंद्र मोरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.