पहूर पोलीसांना झालेल्या मारहाणीचा निषेध; पाचोऱ्यात पोलीस बॉईजचे निवेदन

पाचोरा, प्रतिनिधी । लोणी ता. जामनेर येथे बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व ठाणे अंमलदार यांचेवर काही नागरीकांना हल्ला करून पोलीस निरीक्षक व पोलीसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा पाचोरा येथील पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करत संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

२१ रोजी लोणी ता. जामनेर येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व ठाणे अंमलदार यांनी गावातील अतिक्रमण काढतांना पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात पोलीसांशी हुज्जत घालत लोणी येथील दत्तु कडु उगले, ज्ञानेश्वर कडु उगले, भास्कर काशिनाथ वाघ, महादु कडु उगले, पवन महादु उगले, किर्तीराज केशव उगले, सागर केशव उगले राहणार सर्व लोणी ता. जामनेर यांनी हल्ला चढवुन पोलिस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांना मारहाण व शिवीगाळ केली.

या घटनेच्या निषेधार्थ व संबंधित सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे आज २३ रोजी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस बॉईज असोसिएशनचे जिल्हा सचिव हर्षल पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख, उपाध्यक्ष प्रफुल पाटील, जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील, हितेंद्र पाटील सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे (जळगांव), पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे (पाचोरा), आमदार किशोर पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Protected Content