विद्यापीठ निवडणूकांचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

SNIMAGE40598university 1

जळगाव, प्रतिनिधी | नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार कॅम्पसमधील खुल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी सूचना या निवडणुकांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीने विद्यापीठांना केली आहे. यामुळे विद्यापीठास या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. दरम्यान, आगामी दोन ते तीन दिवसांंमध्ये  निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता विश्वनीय सूत्राकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राजपत्रानुसार या निवडणुकांची प्रक्रिया ३१ जुलैपूर्वीच जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र, सद्य:स्थितीत अनेक महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित असल्याची तांत्रिक अडचण शिक्षणसंस्थांच्या वतीने उपस्थित करण्यात आली होती. यानंतर या मुद्द्यावर समितीने विचार करून आता ऑगस्टमध्ये निवडणूक कार्यक्रम निश्चित करून ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी परिषदांच्या स्थापनांची नवीन ‘डेडलाइन’ देण्यात आली आहे. या निवडणुकांसंदर्भात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे प्रशासकीय तयारी सुरु झाली आहे. यासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पता ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर ज्यांना विद्यापीठ निवडणुकीचा अनुभव अशा ८-१० जणांचा विद्यार्थी निवडणूक मार्गदर्शक गट स्थापना करण्यात आला आहे. या गटातर्फे विविध महाविद्यालयांच्या प्राचार्य व विद्यार्थ्यांनां मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यापीठ निवडणूक कार्यक्रमाची आखणी सुरु असून दोन ते तीन दिवसात निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता विश्वनीय सूत्राकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Protected Content