विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलिसांचे पथसंचलन

raver 2

रावेर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील संवेदनशील आणि समिश्र लोकवस्तीतून आज सकाळी १०:३० वाजे सुमारास पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.

फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस कर्मचारी सीआयएसएफचे अधिकारी, जवान, आरसिपीचे प्लाटुन जवान यांच्यासह होमगार्ड पथक सहभागी झाले होते.
शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन रूटमार्च करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचशील चौक, बंडू चौक, संभाजी नगर, नागझिरी चौक, महात्मा फुले चौक, राजे शिवाजी चौक, कारागीर नगर, भोई वाडा, गांधी चौक मार्गे रावेर पोलीस स्टेशन ह्या मार्गाने पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या नेतृत्वात रूट मार्च आज काढण्यात आला. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक व रावेर पोलीस स्टेशनचे 25 कर्मचारी, 70 होमगार्ड, CISF प्लाटूनचे 02 अधिकारी, 58 कर्मचारी, RCP प्लाटूनचे 22 कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content