यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्व आणि ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी यावल पोलीस विभागाचे शहरातून पथसंचलन काढण्यात आले.
यावल शहरात पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायद्या सुव्यवस्था राखण्याकामी बुधवारी २० सप्टेंबर रोजी यावल शहरात साजरे होणारे गणेश उत्सव व विसर्जन मिरवणूक मार्ग तसेच संमिश्र वस्तीतूनच्या परिसरात ०२ अधिकारी, ३० पोलीस अंमलदार, ०९ रिक्रुट आणि ५५ होमगार्ड असे पथ संचलन काढण्यात आले व त्यानंतर बंदोबस्त व सेवा पुस्तक वाटप करून सर्व पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचारी यांना आपापल्या बंदोबस्त कामी नेमणुकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आले.
सर्व हिन्दु मुस्लीम बांधवांनी एकत्र येवुन कुठल्याही समाज बांधवांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची दक्षता घेवुन कायद्याचे परिपुर्ण पालन करीत संपूर्ण जळगाव जिल्ह्याला शांततेचा संदेश जाईल असे येणारे सण गुण्यागोविंदाने साजरे करावे, असे आवाहन पो.नि. राकेश मानगावकर यांनी केले आहे .