यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजेंद्र सुकदेव पवार यांना मासिक गुन्हे शोध तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
राजेंद्र पवार हे मागील तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून यावल पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. फैजपूर विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या हस्ते फैजपूर तालुका यावल येथे झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
राजेंद्र पवार यांनी मागील महिन्यात गुन्हे शोध कार्यात लक्षणीय कामगिरी बजावली. यामुळे त्यांना ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ पुरस्कार देण्यात आला. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोळुंके, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरीक्षक असलम खान, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे आणि त्यांच्या सर्व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी राजेंद्र पवार यांचे अभिनंदन केले आहे.