रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरासह परिसरात १७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. रावेर शहरातील २५ सार्वजनिक गणेश मंडळे आणि ग्रामीण भागातील २० सार्वजनिक गणेश मंडळे बाप्पाचे विसर्जन करणार आहेत. यासाठी मोठा बंदोबस्त असणार आहे.
रावेर शहरातील २५ सार्वजनिक गणेश मंडळे आपल्या बाप्पाचे विसर्जन करणार आहेत. ग्रामीण भागातील संवेदनशील रसलपुर, खिरवळ, आभोडा, आणि आहीरवाडी येथे देखील सुमारे २० सार्वजनिक गणेश मंडळांचे उद्याच विसर्जन होणार आहे. यासाठी पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासन सज्ज झाले आहे.
१६ सप्टेंबर रोजी रावेर पोलिस स्टेशनतर्फे रूट मार्च आयोजित करण्यात आला. उद्याच्या बंदोबस्तात सहायक पोलिस अधिक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, आठ पोलिस अधिकारी, एसआरपी प्लाटून, आरएसपी एक प्लाटून स्ट्रायकींग फोर्स, होमगार्डचे ११० जवान, हेडकॉन्स्टेबल २० कर्मचारी, ४५ स्थानिक पोलिस आणि एलसीबीचे ५ कर्मचारी असा तगडा बंदोबस्त तैनात राहणार आहे. त्यांच्या जोडीला ड्रोन आणि फोटोग्राफर यांची करडी नजर मिरवणुकीवर असणार आहे.