Home धर्म-समाज पारोळ्यात गणेश विसर्जनात ‘महिला सुरक्षेवर’ बॅनरबाजी

पारोळ्यात गणेश विसर्जनात ‘महिला सुरक्षेवर’ बॅनरबाजी

0
125

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरात अनेक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सोमवारी जल्लोषात काढण्यात आली.विसर्जन मिरवणुकीत मोरफळ गल्लीतील राधाकृष्ण गणेश मित्र मंडळ,खांडेकर वाड्यातील सर्वेश्वर गणेश मित्र मंडळाचा महिलांनी डी जे चा तालावर ठेका धरत ‘महीला व देश सुरक्षेवर’ बॅनरबाजी केली. मोदीजी,योगीजी,सनातन धर्म रक्षक धिरेंद्र शास्त्री आदींची ही बॅनरबाजी व जनजागृती केल्याने यावेळी सर्वांचे लक्ष वेधले होते.गुलाल,फुल पाकळ्यांची उधळण करीत ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ चा जल्लोषाने परिसर दुमदुमून सर्वत्र चैतन्य निर्माण झाले होते,बाप्पाचा विसर्जन प्रसंगी गणेश भक्तांचे डोळे पाणावले,भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.

दरम्यान विसर्जनापूर्वी अनेक ठिकाणी महाप्रसाद (भंडारा) कार्यक्रम ठेवण्यात आला.आझाद चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाने रविवारी मसालेभात,चवळी भाजी,पुरी व शिऱ्याचा विशाल सार्वजनिक महाप्रसाद (भंडारा) ठेवला होता. त्यात आठ हजारावर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला विशेष म्हणजे या मंडळात गणपती स्थापनेपासून विविध स्पर्धा, समाजप्रबोधनावर जनजागृती तसेच कीर्तन व कलावंताकडून भक्तीमय गीतांचे आयोजन आदी उपक्रम राबविण्यात आले. याचा भाविक भक्तांनी भरभरून आनंद लुटला. तसेच मोरफळ गल्लीतील राधा कृष्णा गणेश मंडळ,खांडेकर वाड्यातील सर्वेश्वर गणेश मित्र मंडळ व मडक्या मारूती चौकातील श्रीराम गणेश मित्र मंडळ आदी ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आले.


Protected Content

Play sound