शेळगाव येथे गावठी दारूभट्टीवर पोलीसांची कारवाई; एकावर गुन्हा

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील शेळगाव तळेगाव येथे गावठी दारू तयार करणाऱ्या तरूणावर कारवाई करून त्याच्या जवळील १६ हजार रुपये किंमतीच्या कच्चे रसायनासहित अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी आहे की, तालुक्यातील शेळगाव तळेगाव येथे गावठी दारू तयार करून परिसरात विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत अंदाजे १६ हजार रूपये किंमतीच्या कच्चे पक्के रसायनासहीत आरोपी गोकुळ रतन सोनवणे (वय-३२) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ. संजय पाटील, पो.ना. किशोर परदेशी, रामदास कुंभार, पो.कॉ. ज्ञानेश्वर देशमुख यांच्या पथकाने शेळगाव परिसरातील ओघाड नाल्याजवळ धाड टाकुन ही कारवाई करण्यात आली. तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी परिसरात कुठेही अशा प्रकारे अवैधपणे गावठी दारू तयार करणाऱ्याविषयी आम्हाला माहिती देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.