मंजूर झालेल्या निधीतून तात्काळ कामे पूर्ण करा; महापौर व उपमहापौरांचे निर्देश (व्हिडीओ)

कामे पुर्ण करण्याच्या दिल्या सुचना

जळगाव प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव शहरासाठी मंजूर केलेल्या निधीतून शहरातील रखडलेली कामे पुर्ण करण्यासाठी महापौर आणि उपमहापौर यांनी आज अधिकार्‍यांची बैठक घेतली. यात मंजूर झालेल्या ६१ कोटी निधीतून लवकरात लवकर कामे करावे अश्या सुचना महापौर सौ. जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिल्या आहेत.

सविस्तर असे की, जळगाव शहरात निधी अभावी लगतचे नाले, अमृत योजना, नळाचे कामे, भुयारी गटरी आणि रस्त्यांवरील प्रमुख कामे रखडलेत. त्यावर आता पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी रविवारी सकाळी अजिंठा विश्रामगृह येथे जळगाव शहरासाठी ६१ कोटी मंजूर केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. पालकमंत्री ना. पाटील यांच्याकडून निधी मंजूर झाल्यामुळे जळगाव शहरात पावसाळ्यापुर्वी ही कामे लवकरात लवकर पुर्ण व्हावे या अनुषंगाने आज महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी महापालिकेत शहरात विविध काम करणारे विविध विभागाचे अधिकारी आणि अभियंता यांच्या समवेत संयुक्त बैठक घेतली. याप्रसंगी कामांबाबत सविस्तर चर्चा होऊन पावसाळा सुरू होण्यापुर्वी प्रत्येक मक्तेदाराने घेतलेली कामे वेळेत पुर्ण करावे अश्या सुचना देण्यात आल्या.

या बैठकीला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, बांधकाम विभागाचे अभीयंता अरविंद भोसले, नगर विकास शाखेचे साळुंखे, अमृत योजना विभागाचे बर्‍हाटे आणि प्रतिनिधी, श्री पटेल आदींची उपस्थिती होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.