पीएमसी बँक खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 

pmc bank

 

मुंबई (वृत्तसंस्था) घोटाळ्यामुळे निर्बंध लादण्यात आलेल्या पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेसमोर (PMC) निदर्शने करणाऱ्या एका खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

 

संजय गुलाटी असे मृत खातेदाराचे नाव आहे. सोमवारी मुंबईत किला कोर्टासमोर झालेल्या रॅलीनंतर संजय गुलाटी अंधेरी पश्चिमेतील घरी गेले. जेवल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. म्हणून त्यांना तात्काळ कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले संजय गुलाटी जेट एअरवेजचे कर्मचारी होते. मात्र त्यांचं काम थांबवण्यात आले होते. त्यातच बॅंकेत पैसे अडकल्याने ते त्रस्त होते.

 

बॅंकेत गैरव्यवहार झाल्याने रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सगळ्याच खातेदारांना आणि ज्यांचे बॅंकेत पगार व्हायचे त्यांच्यापुढे मोठी समस्या निर्माण झाली. त्यानंतर सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना दिवसाला केवळ १००० रूपये काढण्याची मुभा दिली होती. मात्र, त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. तेव्हा रिझर्व्ह बँकेने पहिल्या टप्प्यात ही मर्यादा १० हजार आणि त्यानंतर २५ हजारापर्यंत वाढवली होती. परंतु, तरीही खातेधारकांच्या अडचणी कमी झाल्या नव्हत्या.

Protected Content