उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण महत्वाचे : एसपी डॉ. महेश्वर रेड्डी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सर्वत्र पर्यावरणाची हानी होणे सुरु आहे. त्यामुळे तापमान वाढतच आहे. मानवाला उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्वाचे झाले आहे. वृक्ष असतील तरच मानवजाती वाचणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बनवून ठेवा असे प्रतिपादन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.

सामाजिक वनीकरण विभाग, चेतना व्यसनमुक्ती केंद्र व राष्ट्रीय हरित सेना यांच्यामार्फत दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी प्रमुख पाहुणे होते. यावेळी डॉ. रेड्डी यांच्या हस्ते विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी चिंच, पिंपळ, लिंब या साठ रोपांची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी वनपरिक्षेत्राधिकारी एस. आय. पिंजारी वनपाल एस. आर. पाटील, वनरक्षक बलदेव मोरे, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रवीण पाटील, संभाजी पाटील, अमोल ढोबळे, प्राचार्य रूपाली वाघ, डॉ सपना बोथरा, संघपाल तायडे हे उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतीक सोनार, दीपक पाटील, किरण सोनवणे, निलेश काळे यांनी सहकार्य केले.

Protected Content