पाडळसरे येथे उद्या “नाटेश्वर महादेव” यात्रोत्सव

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाडळसरे ग्रामस्थांचे आराध्य दैवत “नाटेश्वर” महादेवाच्या यात्रोत्सव यंदा ही माघ कृष्ण दशमी म्हणजे उद्या साजरी करण्यात येणार आहे.

खान्देश गंगा सुर्यकन्या तापी, अनेर व बोरी नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी दक्षिण तीरावर श्रीक्षेत्र पाडळसरे येथील ग्रामवासीयांचे आराध्य दैवत , पुरातन जागृत देवस्थान व नवसाला  पावणारे  ” नाटेश्वर ” महादेवाचा यात्रोत्सव सालाबादा प्रमाणे या वर्षी ही माघ कृष्ण दशमी म्हणजेच शनिवारी (दि.२६) रोजी पाडळसरे ग्रामस्थांकडून साजरा करण्यात येणार असून या ठिकाणी पुर्वी पासुन बोकड बळीची प्रथाच नसल्याने महादेवाला दाल बट्टी चा शाकाहारी नैवेद्य गावातील घराघरातून दाखविण्यात येतो व नवसपूर्ती केली जाते, यात्रोत्सव निमित्त मंदिर परिसरात रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने पाडळसरे ग्रामपंचायत कडून लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत शिवलिंग म्हणून द्वादश ज्योतिर्लिंगां पैकी एक प्रति नाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व मंदिर विलोभनीय असून काळ्या दगडांनी हेमांड पंथीय कलाविष्काराने मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून कोरीव आरेखन घुमटाच्या वर चार उपदिशांना वाघाच्या मूर्त्या व त्यावर कळस आणी भागवत धर्माची पताका व मंदिरात पाषाण शिळा त्यात लिंग हे संगमरवरी आहे. धुळे व जळगाव जिल्ह्य़ाची सीमेवर चोपडा शिरपुर व अमळनेर या तीन तालुक्यांचे सीमेचा केंद्र बिंदूवर सुर्यमुखी मंदिराचा समोर पश्चिम वाहिनी तापी, दक्षिण वाहिनी अनेर व उत्तर वाहिनी बोरी नदी च्या विलक्षण रमणीय नैसर्गिक परिसरात त्रिवेणी संगमस्थळी नाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व मंदिर स्थापित आहे. नवसाला पावणारे नाटेश्वर महादेव म्हणून ख्याती असलेले या मंदिराचा जीर्णोद्धार थोर समाजसेविका अहिल्याबाई होळकर यांनी कपिलेश्वर मंदिर जीर्णोद्धार समयी केला असल्याची आख्यायिका आहे.

यात्रेच्या दिवशी गावातील सर्व जाती धर्मातील कुटुंबीयांकडून महादेवाला दाल बट्टीचा शाकाहारी नैवेद्य दाखविला जातो. नवसपुर्ती साठी येथे भाविक गर्दी करतात ग्रामवासीयांच्या करमणूकी साठी पाडळसरे ग्रामपंचायतीने रतन भोई नगरदेवळेकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. तर खेळणी, पाळने, उपहारगृह आदींसह विविध वस्तूचे दुकाने थाटली जातात.

 

Protected Content