अखिल भारतीय लेवा महिला समाज भुषण पुरस्कार सोहळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । लेवा सम्राज्ञी फाउंडेनतर्फे नुकताच अखिल भारतीय लेवा महिला समाज भुषण पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्ववाचा ठसा उमटविणार्‍या तसेच संघर्षमय जीवन जगून विशेष कार्य करणार्‍या तब्ब्ल १२४ स्त्रीयांना फेसबुक गृपसह झुमअ‍ॅपद्वारे सुरु घेण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात लेवा सम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.केतकी पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय स्तरावर लेवा समाज संघटित व्हावा त्यादृष्टीने कला, क्रिडा, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात समाजातील महिलांनी आपला वेगळा ठसा उमटविला अशा स्त्रीयांच्या कार्याची ओळख व्हावी या अनुषंगाने यंदाच्यावर्षी मार्च महिन्यात लेवा सम्राज्ञी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. शनिवार, ३१ ऑक्टोंबर रोजी फेसबुक गृपसह झुम अ‍ॅपद्वारे सन्मान सोहळा घेण्यात आला. नाशिकच्या प्रतिभा चौधरी यांनी सरस्वती वंदन तर ठाण्याच्या अंजली बोरोले यांनी स्वागतगीत सादर केले. याप्रसंगी डॉ.तारा चौधरी, डॉ.प्रमोद महाजन, रविंद्र चौधरी, पुरुषोत्तम पिंपळे, सुनील पाटील यांना निमंत्रित केले होते. यावेळी देशभरातील १२४ स्त्रीयांना सन्मानित करण्यात आले. ट्रॉफी, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते, ते सन्मानार्थींना कुरियर करण्यात आले. या सोहळ्यासाठी दोनशेपेक्षा अधिक प्रस्ताव आले होते. त्यात अमेरिकेतील तनुजा नेमाडे यांचाही समावेश होता. ऑनलाईनद्वारे रंगलेल्या या सोहळ्यात स्त्रीयांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यात संघर्षमय जीवन जगणार्‍या स्त्रीयांचे मनोगत ऐकतांना अश्रू अनावर झाल्याचे लेवा सम्राज्ञी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.ज्योती महाजन यांनी सांगितले. अखिल भारतीय लेवा महिला भुषण पुरस्काराचे आयोजन यशस्वीरित्यापूर्ण करण्यासाठी लेवा सम्राज्ञी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.ज्योती महाजन, उपाध्यक्षा पुजा भंगाळे, सचिव नीता वराडे, डॉ,अंजली भिरुड, रेखा बोरोले, अ‍ॅड.ज्योती भोळे, डॉ.सुनिता चौधरी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुनिता चौधरी, अ‍ॅड.ज्योती भोळे यांनी तर आभार निता वराडे यांनी मानले. यांचा झाला सन्मान जळगाव शहरासह देशभरातील कर्तृत्ववान स्त्रीयांमध्ये डॉ.केतकी पाटील, खासदार रक्षा खडसे, लिला गाजरे, किरण बढे, लता चौधरी, तारा चौधरी, कुमूदिनी फेगडे, कल्पना महाजन, शिल्पा बेंडाळे, सरोज चौधरी, डॉ.नंदिनी पाटील, विजया पिंपळे, प्रतिभा वराडे, डॉ.अर्चना नेहते, निता वायकोळे, राजश्री पाटील, निलीमा ठोंबरे, उर्मिला पाटील, वसुंधरा राणे, डॉ.अर्चना ठोंबरे, डॉ,कविता बोंडे, भाग्यश्री पाचपांडे, निशा अत्तरदे, प्रतिभा चौधरी, सुवर्णलता पाटील, रेखा भोळे, मनिषा खडके, सीमा महाजन, आशा कोल्हे, पल्लवी लोखंडे, माजी महापौर सीमा भोळे, सिंधुताई कोल्हे, पूनम चौधरी, प्रतिभा राणे, डॉ.सुजाता भारंबे, आशालता पाटील, जया पाटील, सुरेखा कुरकुरे, बबिता पाटील, डॉ.वर्षा झोपे, वर्षा इंगळे, वंदना चौधरी, मधुबाला जंगले, सुप्रिया राणे, सायली महाजन, मिनल पाटील, शिल्पा पाटील, लिना पाटील, रेखा पाटील, प्रतिभा धांडे, स्वाती पाचपांडे, साधना लोखंडे, शारदा चौधरी, विजया नारखेडे, जयश्री बर्‍हाटे, पुष्पा पाटील, सायली पाटील, वैशाली पाटील, सायली लोखंडे, छाया बेंडाळे, दिपाली नारखेडे, शुभांगी सरोदे, दिपाली भोळे, निरुपमा चिरमाडे, स्मिता झोपे, जयश्री चौधरी, छाया पाटील, उषा फिरके, रितेश्वरी कराटे, वैशाली झोपे वैशाली झोपे, वैशाली झांबरे, अंजली बोरोले, सरलिा भिरुड, सुप्रिया लोखंडे, सुरेखा महाजन, शिक्षणाधिकारी शशिकला अत्तरदे, मधुबाला पाटील, प्रभाताई पाटील, माधुरी चौधरी, मंत्रालयातील चारुशिला चौधरी, किर्ती पाटील, स्नेहा राणे, शोभना पाटील, लिना भंगाळे, पल्लवी भोळे, कोकिळ चौधरी, वर्षा साई, चारुलता राणे, संगिता कोल्हे, हिना भंगाळे, ललिता टोके, संगिता चौधरी, नलिनी बेंडाळे, डॉ.अनिता बेंडाळे, प्रतिभा खडके, डॉ.स्मिता चौधरी, डॉ.लिना पाटील, सरपंच सुशिला भारंबे, सरपंच भावना बोरोले, किरण पाचपांडे, निता ढाके, तनुजा नेमाडे, मनिषा बेंडाळे, भाग्यश्री भंगाळे, सुरेखा फेगडे, डॉ.जयंती चौधरी, अश्लेषा चौधरी, चित्रा महाजन, भारती ढाके, निता गाजरे, जस्मीन गाजरे, भारतीय फालक, माधुरी ढाके, चेतना जावळे, प्रियंका सरोदे, नम्रता भोळे, पल्लवी चौधरी, सपना रडे, जयश्री धांडे, हर्षाली चौधरी, जयश्री महाजन, मंगला पाटील यांचा समावेश होता.

Protected Content