भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्टेशन रोड ते आनंद नगरपर्यंत खड्ड्याच्या जागी फुले वाहत आम आदमी पार्टीतर्फे पूजा करत उपरोधिक स्वरूपात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी न.पा. कारभार विरोधात घोषणा देण्यात येऊन निषेध करण्यात आला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते संतोषी माता सोसायटीपर्यंत रोड मंजूर आहे. सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून यातील खड्ड्यांमुळे लोकांना पाठीचे विकारसह अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘या खडका रोड आणि शहरातील खराब रस्त्याबद्दल तीन महिन्यापासून दिले आहेत. पण अद्याप कामे अपूर्ण असून झालीली काम निकृष्ट दर्जाची आहेत.’ असं म्हणत या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी. अशी मागणी शहरातील आम आदमी पार्टीने आहे.
आज स्टेशन रोड ते आनंद नगरपर्यंत खड्ड्याच्या जागी फुले वाहत पक्षातर्फे पूजा करत उपरोधिक स्वरूपात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी न.पा. कारभार विरोधात घोषणा देण्यात येऊन निषेध करण्यात आला.
या आंदोलनात दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक, प्रदेश सहसचिव, आम आदमी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य, प्रमोद पाटील, तालुका अध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते कैलाश उपाध्याय, युवा अध्यक्ष करण लखन, रितेश सोनवणे, जितेश कछवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.