‘झाडी’ येथे डुकरांचा उपद्रव – शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

अमळनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील ‘झाडी’ येथे डुकरांच्या उपद्रवात ‘ शेतकऱ्याच्या ‘अर्धा एकर मक्या’चे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील ‘झाडी’ येथील शिवाजी सुकलाल देवरे यांनी आपल्या गावालगत असलेल्या शेतात दोन एकर मक्याची लागवड केली होती. त्यातील अर्धा एकर मका डुकरांमुळे फस्त झाला असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

गावात मोठ्या प्रमाणावर डुकरे झाली असून डुक्कर मालक ‘गलवाडे’ येथील रहिवासी बापू आनंदा पवार यांना नुकसानीविषयी तक्रार करत वेळोवेळी तोंडी सांगितले. मात्र ते याकडे दुर्लक्ष करीत असून ‘झाडी’ ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आपली मनमानी करत ‘झाडी’ येथे डुकरे सोडून जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गावात डुकरांच्या वाढत गेलेल्या उपद्रवाविषयी ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी तहसीलदार प्रांत अमळनेर यांना निवेदन दिले असून डुक्कर मालकावर तात्काळ कारवाई करावी अशी करण्यात आली आहे.

Protected Content