फैजपुरातून मा. ज्ञानेश्वर महाराज पालखीस प्रस्थान

.jpg

फैजपूर प्रतिनिधी । आळंदी येथून आज (दि. 26 जून) रोजी माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास प्रस्थान झाले आहे. लाखो वारकरी भाविकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, दिगंबर महाराज चिनवलकर मठ संस्था अध्यक्ष नरेंद नारखेडे, ह.भ.प.भरत महाराज म्हैसवडीकर, विक्रांत नारखेडे, मयूर नारखेडे, धीरज नारखेडे, किशोर तांबट, हेमराज टोके, भानूदास महाराज भुसावळ, मूलचंद सरोदे यांसह भाविकांनी या सोहळ्यात शेडगे दिंडी नं 3 चे माध्यमातून वारी करणार आहे. या दिंडीमध्ये सर्व वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार सहभागी झाले आहे. ह.भ.प. पांडुरंग महाराज धुळे, शिंदे माऊली सह वारकरी शिक्षण संस्था, गाथा मंदिर देहू गुरुकुलचे सर्व शिक्षक महाराज, वर्ग व विद्यार्थी सह पालखी सोहळ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले की, आज (दि. 26 जून) रोजी पूणे मुक्काम असून, त्यापुढे सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, वेळापूर, नातेपुते व वेळापूर या मार्गे वाखरी येथे हा पालखी सोहळा वं महाराष्ट्रतून आलेल्या सर्व संताच्या पालखी एकत्र होऊन सुमारें 8 लाख वारकरी मिळून, सोहळा आषाढ एकादशी (दि. 11 जुलै) रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आगमन होणार आहे.

Protected Content