श्री क्षेत्र पद्मालयच्या विकासासाठी प्रयत्नशील – आमदार डॉ.सतीष पाटील

WhatsApp Image 2019 03 05 at 7.21.57 PM

एरंडोल (प्रतिनिधी)। श्री क्षेत्र पद्मालय हे ऐतिहासिक व धार्मिक स्थळ असुन कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे,मात्र या देवस्थानच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे.आगामी काळात श्री क्षेत्र पद्मालयच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन आमदार डॉ.सतीष पाटील यांनी केले.शासनाच्या अर्थसंकल्पात मंजुर करण्यात आलेल्या सुमारे ३ कोटी १६ लाख ५३ हजार रुपये खर्चाच्या गालापूर ते पद्मालय रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते.

पद्मालय ते गालापूर रस्त्याचे भुमिपूजन
यावेळी आमदार डॉ.पाटील यांनी मतदार संघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.मतदार संघात विकास कामे करतांना कोणताही भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे सांगितले.गालापूर ते पद्मालय रस्त्याच्या कामामुळे परिसरातील ग्रामस्थ तसेच दर्शनासाठी येणा-या भाविकांची होणारी गैरसोय दुर होणार असल्याचे सांगितले.तसेच रस्त्याचे काम उच्च दर्जाचे करण्याची सुचना त्यांनी ठेकेदारास केली.श्री क्षेत्र पद्मालय हे जागृत देवस्थान असुन या धार्मिक स्थळास ‘ब’ दर्जा मिळण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमित पाटील,पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, एल..पाटील,डॉ.पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.यापुर्वी झालेल्या एरंडोल ते पद्मालय व पद्मालय ते नागदुली या रस्त्याचे झालेले काम धनश्री इन्फ्रास्ट्रक्चर चे संचालक कुशल तिवारी यांनी अत्यंत चांगल्या दर्जाचे केले असुन सुमारे दोन वर्षाच्या कारकिर्दीत अद्यापपर्यंत रस्त्यावर कोणताही खड्डा पडला नसल्याचे पद्मालय देवस्थानच्या संचालकांनी सांगितले.आमदार डॉ.सतीष पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे भुमिपूजन करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.बी.बाविस्कर यांनी रस्त्याच्या कामा बाबत माहिती दिली.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
डॉ.राजेंद्र देसले यांनी सुत्रसंचलन केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, भिका महाजन, भाऊसाहेब पाटील, गोकुळ देशमुख, अमृत कोळी, गालापुरचे सरपंच आरिफ शेख, शालिग्राम पाटील, दिनेश पवार, निंबा पवार, भिकन खाटिक, किशोर पाटील यांचेसह परिसरातील सरपंच, ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Add Comment

Protected Content