पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ

petrol

 

मुंबई (वृत्तसंस्था) खनिज तेल दरवाढीची झळ भारताला बसत असून पेट्रोलियम कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ८१ रुपये २८ पैसे झाला आहे. तर डिझेल प्रति लीटर ७२ रुपये २ पैसे झाले आहे.

 

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाने जागतिक कमोडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. त्यानुसार सोमवारी मुंबईत पेट्रोल १५ पैसे आणि डिझेल १८ पैशांनी महागले आहे. सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा कायम ठेवला. सलग पाचव्या सत्रात पेट्रोल आणि डिझेल महागले. दिल्लीत पेट्रोल दरात सोमवारी दरात १५ पैशांची वाढ झाली आहे. डिझेल १७ पैशांनी महागले आहे. पेट्रोलचा दर ७५.६९ रुपये आणि डिझेल ६८.६८ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल १५ पैसे आणि डिझेल १८ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर ८१ रुपये २८ पैसे झाला आहे. डिझेल दर प्रति लीटर ७२ रुपये २ पैसे झाले आहे.

Protected Content