आडनाव ठाकरे नसते, तर राज संगीतकारांमध्ये दिसले असते : गुलाबराव पाटील

gulabrao patil and raaj thakre

 

नाशिक (वृत्तसंस्था) ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. यांच्या नेत्याचे नाव जर ठाकरे नसते, तर कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. त्यामुळे ठाकरे आडनावाचं वलय त्यांच्याकडे दिसतंय.’ अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते.

 

नाशिकमधील प्रभाग क्र. 26 च्या पोटनिवडणुकीत उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी मनसेसह विरोधकांवर कडवट टीका केली. यावेळी ना.पाटील पुढे म्हणाले की, राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते. मनसे नावाची पार्टी राहिलीच कुठे आहे? ही तुमच्याकडे (नाशिकमध्ये) दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही. भाजपने नोटबंदी करुन फसवणूक केली आणि आता म्हणता हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केलेली का नाही चालत नाही? असा प्रश्न गुलाबरावांनी विरोधकांना विचारला. भाजपवाले आमच्यात भाडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अमर अकबर अँथनी बघितला आहे का? असा प्रश्न विचारत गुलाबरावांनी हशा पिकवला.

Protected Content