उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचा राजीनामा

डेहराडून । उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा  राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे सोपवला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता दुसऱ्याला मिळायला हवी, असं पक्षाचं मत आहे. मी या पदावर कधी विराजमान होईन, याचा मी विचारही केला नव्हता. मात्र भारतीय जनता पक्षाने मला ही संधी दिली. असं केवळ भाजपमध्येच होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिली आहे.

आमदार धन सिंह रावत, खासदार अनिल बलूनी आणि प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 70 पैकी 57 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला 11 तर अपक्षांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांना भाजपने मुख्यमंत्री केलं. आता 2022मध्ये उत्तराखंड विधानसभेची निवडणूक होईल.

आता उत्तराखंडची धुरा कुणाकडे जाणार याचा सस्पेन्स कायम आहे, मात्र बुधवारी म्हणजे उद्याच भाजप नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करेल असं कळतंय. उद्या भाजपची यासंदर्भात बैठकही होणार आहे.  भाजपचे शिष्ठमंडळाची बैठक झाल्यावर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात येणार आहे.

Protected Content