काय म्हणतंय ठाकरे सरकार? ; संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा प्रोमो शेअर !

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘एकच शरद’ या मुलाखतीनंतर आता ‘सामना’मध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘काय म्हणतंय ठाकरे सरकार?’ असे शिर्षक देऊन मुलाखतीचा पहिला प्रोमो आज ट्विटवर शेअर केला आहे.

 

 

या मुलाखतीचे शूटिंग काल म्हणजेच २० जुलै रोजी पार पडले. तर येत्या २५ आणि २६ जुलैला ही मुलाखत प्रसारित होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची ‘अनलॉक मुलाखत’ असे नाव त्यांनी या मुलाखतीला दिलेले आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज्य ते केंद्र, राम मंदिर निर्माणाचा मुद्दा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ते कोरोना प्रादुर्भाव, महाविकास आघाडीचे नेतृत्व ते सरकारचे स्थैर्य अशा विविध विषयांवर भाष्य केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे. यापूर्वी उद्धव यांनी ‘सामना’ला अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री प्रमुख म्हणून त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे.

Protected Content