मलिक यांना दिलासा नाहीच !

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांना आजदेखील दिलासा मिळाला नाही. विशेष न्यायालयाने मलिक यांना १८ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नसून त्या वाढताना दिसत आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करीत आज पुन्हा १८ एप्रिल पर्यंत वाढ केली आहे.

दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून ३०० कोटींच्या संपत्ती वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक मंत्री मलिक यांच्यावर आहे. पीडित मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीनीची किमत ३०० कोटी रुपये असून ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप आहे. २३ फेब्रुवारी रोजी ईडीकडून मलिक यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवाब मलिक यांना बिछाना आणि खुर्ची उपलब्ध करून दिली जाणार असून त्यांना घरचं जेवण आणि औषधी घेण्यासही न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.

Protected Content