यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील केळी उत्पादकांना अद्यापही विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे निवेदनाच्या माध्यमातून ही रक्कम त्वरीत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यात यावल तालुका हा केळीच्या बागासाठी जगभर प्रसिद्ध असून परिसरात बारा ही महिने केळीचे पीक लागवड करण्यात येत असते. या भागात मागील वर्षी काही शेतकर्यांनी केळी च्या बागा लावल्या असता यांचे विमे काढले असून आज पर्यंत नुकसान ग्रस्त शेतकर्यांना विम्याच्या रकमा मिळाल्या नाहीत.
या अनुषंगाने रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवीप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली रयत शेतकरी संघटने चे जिल्हा कार्याध्यक्ष रमजान पिंजारी यांनी शेतकर्यांच्या हितासाठी शेतकर्यांना सोबत घेऊन यावल तहसीलदार यांना केळी पीक विम्याच्या अनुदान व खरीप हंगामातील पीक विम्याच्या अनुदान लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करावयाची मागणीचे निवेदन दिले.
तसेच खरीप हंगामामध्ये ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या खंडामुळे उडीद, तूर,मका,कापूस,सोयाबीन,ज्वारी या पिकांचेही नुकसान झाले असून काही शेतकर्यांनी खरिपाच्या विम्याचा लाभ घेतला आहे. मात्र खरीप हंगामाची नुकसान झाले असता विमाकंपनीने रब्बी हंगामा तील केळी व खरीप हंगामातील पिक विम्याची रक्कम आजपर्यंत शेतकर्यां च्या खात्यात वर्ग न केल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे.
तरी प्रशासनाने या विषयाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर शेतकर्यांच्या अनुदान खात्यात वर्ग करावयासाठी मागणी केली असून अनुदान तात्काळ जमा न केल्यास रयत शेतकरी संघटने च्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार मनोज खारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी राजेंद्र पाटील कैलास वराडे, बापूराव ठाकूर, रामराव ठाकूर, निवृत्ती हिवराळे,सिताराम महाजन,संजय पाटील,साहेबराव ठाकूर,रोहिदास कोळी,रज्जाक तडवी, जहांगीर तडवी आदींनी शेतकर्यांच्या सह्यांचे निवेदन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना दिले आहे. लवकरात लवकर प्रशासनाने मागणी मान्य करावी अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.