यावल तालुक्यात राज्य शासन कर्मचाऱ्यांचा एक दिवशीय लाक्षणिक संप

WhatsApp Image 2020 01 08 at 5.03.45 PM

यावल, प्रतिनिधी | राज्यातील शासकीय कर्मचाराऱ्यांनी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि. ९ जानेवारी रोजी एक दिवशीय लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात विविध विभागाच्या कर्मचाराऱ्यांनी यात सहभाग घेतला आहे. यासंपामुळे नागरीकांच्या दैनदिन कामावर याचा मोठा परिणाम दिसुन आला.

महाराष्ट्र राज्याच्या अधिकारी महासंघाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची १० डिसेंबर रोजी भेट घेवुन विविध मागण्यांची माहीती त्यांच्या निदर्शनास आणुन दिली होती. यात प्रामुख्याने अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यासाठी लागु करावी , सुधारीत आश्वासित प्रगती योजनेकरिता असलेली रुपये ५४०० / ग्रेड वेतनाची मर्यादा रद्द करावी, वेतनत्रुटी संबंधीचा बक्षी समितीच्या अहवालाची विनाविलंब अंमलबजावणी व्हावी आदी मागण्यासाठी राज्याच्या अधिकारी महासंघाच्या वतीने संप पुकारण्यात आला होता. या संपात यावल तालुक्यातीत महसुलच्या कर्मचाराऱ्यांनी त्याचप्रमाणे तालुका भुमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी, उपकोषागार कार्यालय, दुय्यम निबंधक विभाग यांच्यासह यावल तालुका कोतवाल संघांचे अध्यक्ष ताराचंद तावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार लिलाधर सपकाळे, हरीश चौधरी, सुमन हर्षल आंबेकर, सुरेश रामदास तायडे, तुषार अनिल जाधव, पंढरीनाथ किसन अडकमोल, प्रशांत प्रमोद सरोदे यांच्यासह आदी कोतवाल संघटनेच्या पदधिकारी सहभागी झाले होते.

Protected Content