दीपोत्सवाने सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी अवतरण महोत्सवास प्रारंभ

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सर्वज्ञ भगवान चक्रधर स्वामी यांच्या अष्टशताब्दी अवतरण महोत्सवास दीपोत्सवाच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आला आहे.

सावदा येथील श्रीदत्त मंदिर संस्थान येथे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रथमतः श्रीमुर्तीस अभिषेक तथा पूजन करून विडा अवसर समर्पित करण्यात आला. या नंतर ८०० दीप देवासमोर आणि संपूर्ण मंदिरात आणखी ४०० असे एकूण १२०० दीप प्रज्वलित करण्यात आले. दीप प्रकाशने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला. स्वामींनी ८०० वर्षापासून जो ज्ञानदीप भारतभूमी वर प्रज्वलित केला जो आजही अखंडितपणे तेवत आहे. ही सर्व सजावट मंदिरातील साधकांनी भाविकांनी केली.

दरम्यान, दीपोत्सवाच्या माध्यमातून सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी महोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. याचे औचित्य साधून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने प्रबोधनपर कार्यक्रमांचा समावेश असेल अशी माहिती आचार्य मानेकर शास्त्री यांनी दिली आहे.

Protected Content