झांबरे विद्यालयात महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । ए‌.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यत्र नार्यस्तु पूज्यंते हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमात विद्यालयाच्या सर्व महिला शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.महिला दिन साजरा करण्याचा इतिहास, महिला सशक्तीकरण, स्वातंत्रा बरोबरच सहकार्य ची गरज, महीलांचा आत्मसन्मान, महिलांच्या सुरक्षेसाठी योजना, महिलांना लोकशाही चे महत्व, आजची करीअर प्रधान  स्त्री आणि आव्हाने, स्त्री च्या संघर्षाची , कर्तृत्वाची गोडवे गाणाऱ्या कविता अशा विविधांगी रुपे सर्व महिला शिक्षिकांनी सादर केले.या कार्यमाचे आयोजन गुगल मिट वर आॅनलाईन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रतिभा लोहार, वर्षा राणे, माधुरी भंगाळे, वंदना मोरे, सुचेता शिरसाट, पूनम कोल्हे, रोहीणी पाटील, ज्योती चौधरी, प्रतिभा नेहते यांचा सहभाग होता.तसेच दामोदर धनंजय चौधरी आणि सृष्टी विशाल कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त भाषण सादर केले.तर सर्व विद्यार्थ्यांसाठी महीला दिन विशेष हे कोडे व्हाटस् अप वर पाठवण्यात आले. मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, एम.एस.नेमाडे, पराग राणे नेमिचंद झोपे यांनी सहकार्य केले.

Protected Content