पवार आरोपी, आम्ही बोलावू तेव्हाच यावे लागेल ; ईडीची आडमुठी भूमिका

 

sharad pawar new 696x447

 

मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवार आरोपी आहेत, ईडीमध्ये येण्याबाबत पवार ठरवू शकत नाहीत. चौकशीला बोलावल्यानंतरच पवारांना याने लागेल, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शरद पवार आज दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पण शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाण्याआधीच ईडीने कठोर भूमिका घेतली आहे. ईडी कार्यालयात जाण्याचा निर्धार शरद पवारांनी केला असला तरी त्यांना कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Protected Content