भादलीजवळ ट्रॅक्टर उलटले : एक महिला ठार; १५ जखमी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली येथे शेतमजूर महिलांना घरी घेऊन जाणारे ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून १५ महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील भादली येथील पाटाच्या रस्त्याच्या बाजूने शेतमजूर महिलांना घेऊन एक ट्रॅक्टर गावाकडे येत होते. इतक्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले. यात एक महिला ठार झाली असून १५ महिला जखमी झाल्या आहेत. जखमींपैकी काही महिलांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भिती आहे.

या अपघाताचे वृत्त मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जळगावला पाठविण्यात आले आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

Protected Content