सांगवी येथील ग्रामस्थांना मतदानासाठी धमक्या; न्यायालयात मागितली दाद

crime 4 3

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी येथील ग्रामस्थांना गावातीलच काहींनी धमकी देत ‘आम्ही सांगेल त्या आमदाराला मतदान करावे नाहीत जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिल्याप्रकरणी ग्रामस्थांनी चाळीसगाव न्यायालयात धाव घेतली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सांगवी येथील धाडी समाजाचे रहिवाशी लिलाबाई अनिल राठोड, अक्का सुरेश राठोड, कमलाबाई रामा राठोड, सुबीबाई मांगीलाल राठोड, संगीताबाई विजय राठोड, मायाबाई साहेबराव राठोड यांनी चाळीसगाव येथील न्यायालयात तक्रार दाखल केली आहे की, आम्हाला सांगवी येथील रोहिदास उदा राठोड, दावल परशुराम राठोड, राजू बुधा राठोड, अंबु सूर्मल चव्हाण, छोटू काळू चव्हाण, अंकुश भगवान चव्हाण सांगवी हे मागील एक महिन्यापासून आम्हाला दमदाटी शिवीगाळ करून पैशाचे धाक दाखवून आम्ही सांगू तिथेच आमदारकीचा निवडणुकीत मतदान करावे लागेल. नाहीतर तुम्हाला गावातून हाकलून देऊ तुमची गावातून गाढवावरून धिंड काढून तुमची सर्व मालमत्ता हडप करून घेऊ तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू अशा धमक्या देऊन आम्ही सांगू त्याच उमेदवारास मतदान करा नाही तर जिवंत ठेवणार नाही. शंभर-दोनशे लोकांचा जमाव करून ही मंडळी आम्हाला मारहाण करण्यासाठी येते व रात्री-बेरात्री आमच्या माणसांना आडवून मारहाण करीत असतात या सर्व प्रकाराने आम्ही भयभीत झालो असून या लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी व्हावी अन्यथा आम्हास गावात राहणे मुश्कील होईल अशी तक्रार चाळीसगाव येथील न्यायालयात सांगवी येथील धाडी समाजाच्या काही मंडळींनी केली असून न्यायालयाकडे दाद मागितली आहे.

Protected Content