ओझर येथील तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा तालुक्यातील ओझर येथील २७  वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी १० सप्टेंबर रोजी उघडकीला आले आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. प्रवीण चुडामण पाटील (वय-२७) रा. ओझर ता. पाचोरा असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रवीण चुडामन पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १० सप्टेंबर रोजी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याचा भाऊ ज्ञानेश्वर पाटील यांनी तातडीने त्याला खाजगी वाहनातून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदर करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सूर्यकांत नाईक करीत आहे.

Protected Content