एमआयडीसीतील कंपनीतुन अडीच लाखांचा ऐवज लांबविणारे दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसीतील सी सेक्टर मधील एका कंपनीतुन कंपनीच्या सुपरवायझरसह एकाच्या मदतीने रिक्षाचालकाने अडीच लाख रुपये किमतीच्या तांबे व पितळाच्या पट्ट्या चोरुन नेल्याची घटना उघडकीला आली होती. यातील सुपरवायझरसह एकाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. 

सुपरवायझर जितेंद्र प्रदीप चौधरी (वय ३१, रा. इंद्रजीत सोसायटी रा. खोटेनगर, जळगाव) व हितेश प्रभाकर कोल्हे (वय ३०, रा. आसोदा, ता. जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

सविस्तर असे की, एमआयडीसीतील सी सेक्टर स्पेक्ट्रम इलेक्ट्रीक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतून २ लाख ४० हजार रूपये किंमतीचे तांब्याच्या पट्ट्या आणि १२ हजार रूपये किंमतीचे पितळी कॉईल असा एकुण २ लाख ५२ हजार रूपये किंमतीचा माल कंपनीतून चोरुन नेल्याची घटना २० जून रोजी समोर आली होती. याप्रकरणी कंपनीचा सुरक्षारक्षक भुषण प्रकाश कोळी याच्या फिर्यादीवरुन २१ जून रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी रिक्षाचालक दीपक यशवंत चौधरी (वय ३८, रा. टहाकळी, ता. धरणगाव) याला अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचा माल व रिक्षा पोलिसांनी हस्तगत केली आहे.

 

या गुन्ह्यातील दोन संशयितांबाबत पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, गफार तडवी, सचिन पाटील, मुकेश पाटील, किशोर पाटील यांच्या पथकाने काल सोमवारी सुपरवायझर जितेंद्र प्रदीप चौधरी व हितेश प्रभाकर कोल्हे या दोघांनाही अटक केली. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Protected Content