पोलीस ‘स्थापना दिवसनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे पोलिसांचे पथसंचलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना सप्ताह निमित मंगळवारी ३ जानेवारी रोजी जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हा मुख्यालयापासून वेगवेगळ्या भागातून पथसंचलन काढण्यात आले.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला २ जानेवारी १९६१ साली ध्वज प्रदान केला, तोच दिवस महाराष्ट्र पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र पोलीस दल साप्ताहानिमित्त मंगळवारी ३ जानेवारी सकाळी ११ वाजता पोलीस ‘स्थापना दिवस (रेझिंग डे)’ निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलिसांचे जळगाव शहरात पथसंचलन करण्यात आले. यावेळी नागरिकांना पोलीस दलातील वेगवेगळ्या पथकांचे दंगा व काबू पथक, क्विक रीस्पोंस टीम, वाहतूक पोलीस, पोलीस बँड, पोलीस पथक, अशा पथकांनी पोलीस बँड संगीतावर ऐटीत पथसंचलन करण्यात आले. तर पोलीस बँड पथकाचे चौका चौकात संगीतमय सादरीकरण केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस दलाचे स्वागत करून कौतुक केले.

मा. पोलीस अधीक्षक, श्री एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस बँड पथकाचे संगीताला भरभरून दाद दिली. यावेळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, धारबळे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पोलीस निरीक्षक रामकुष्ण कुंभार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, राखीव पोलीस निरीक्षक सोनावणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अमित माळी यांनी केले.

Protected Content