आरोग्य मंत्री ना. टोपे यांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

 

जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सक्षम व पुरेसा कर्मचारी वर्ग तसेच साधनसामग्री उपलब्ध असतांना देखील १०२ मृत्यू होणे ही चिंतेची बाब आहे. यापुढे मृत्युदर घटला नाही तर कठोर पावले उचला असे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोविड १९ रुग्णालयाच्या भेटी प्रसंगी दिलेत.

आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी दुपारी सव्वा चार वाजता कोविड १९ रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी परिचारिका कक्षाला देखील भेट देऊन तेथे उपस्थित परीचारीकांशी सवांद साधला. यानंतर अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या कक्षात त्यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे , सिव्हिल सर्जन एन. एस. चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, आमदार अनिल पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, निवासी वैद्यकीय अधिकारी किरण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्याथित होते. ना. टोपे यांनी जिल्ह्यात मृत्युदर वाढण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्ह्यातील विविध भेटीचे अनुभव त्यांना सांगितले. यावेळी ना. टोपे यांनी डॉ. खैरे यांच्याकडून कर्मचारी वर्ग, उपलब्ध साधनसामग्री याची माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पुरेसे असल्याचे दिसून आले. मात्र, ना. टोपे यांच्या प्रश्नांना डॉ. खैरे समाधानकारक उत्तरे देऊ नं शकल्याने ना. टोपे यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी विविध डॉक्टरांकडून आकडेवारी व वस्जातुस्णूथिती जाणून घेतली. तीन कोविड रुग्णाची ना. टोपे यांनी फोनद्वारे संवाद साधला. ते किती दिवसापासून दाखल आहेत. काय त्रास होतो आहे आणि तक्रारी त्यांनी कोविड रुग्णांना विचारले. एकंदरीत बैठकीत मृत्युदर वाढण्याचे कारण, कोविड रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय दिसून आला. पुढील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे व प्रशासक डॉ. पाटील यांना विविध सूचना ना. टोपे यांनी दिल्यात. दरम्बैयान, बैठकीत जिल्हाधिकारी व रूग्णालय अधिकारी यांनी सांगितलेल्आया आकडेवारीत तफावत आढळून आली. ना.टोपे कोविड रुग्णालयाच्या व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Protected Content