अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एकावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलीचे वडील शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. अल्पवयीन मुली २२ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता घरी असतांना ती अचानक बेपत्ता झाली. मुलीच्या पालकांनी तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला मुलगी कुठेही आढळून आली नाही. दरम्यान मुलीच्या वडीलांना गावात राहणारा भावेश बळीराम बोरसे यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशयित व्यक्त केला आहे. याबाबत सोमवार २४ मे रोजी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीसात संशयित आरोपी भावेश बळीराम बोरसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

Protected Content