केतकी चितळेला पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका आणि रबाळे पोलिसात अट्रोसिटी प्रकरणी दाखल गुन्ह्यात अभिनेत्री केतकी चितळे अटकेत आहे. तिची पोलीस कोठडी आज संपली, त्यानुसार तिला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी केतकी चितळेला पुन्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच २०२० मधील अट्रोसिटी प्रकरणात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. रबाळे पोलीस ठाण्यात २०२० मध्ये अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने अटकपूर्व जामीन केला. परंतु सप्टेंबर २०२१ मध्ये केतकी चितळेचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. तर पोलीसानी अट्रोसिटी अंतर्गत अटक करणे भाग होते.  केतकी चितळेला अटक टाळल्याचा आरोप असल्याने रबाळे पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली. त्यानंतर तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज पोलीस कोठडी संपल्याने चितळेला ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. त्यानुसार पुन्हा केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठाणे विशेष अट्रोसिटी कोर्टाकडून सुनावण्यात आली.

 

 

 

 

 

 

Protected Content