पॅरीस ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेत पवन सिंह यांची ज्युरी म्हणून निवड

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील सुप्रसिद्ध गन फॉर ग्लोरी या नेमबाजी प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्त महासचिव पवन सिंह यांची जुलै महिन्याच्या शेवटी सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी ज्युरी अर्थात पंच म्हणून निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड होणारे सिंह हे पहिलेच भारतीय असून यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज पद्मश्री गगन नारंग यांची देखील भारतीय संघाचे ‘शेफ-डी-मिशन’ पथकप्रमुख म्हणून निवड झाली आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या नेमबाजी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिलेले एकमेव भारतीय बनल्यानंतर पवन सिंह यांवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ)ने पुन्हा एकदा विश्वास दाखविला असून याही वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ते आरटीएस (रिझल्ट, टाईमिंग व स्कोअर)चे पंच सदस्य म्हणून काम पाहतील. नेमबाजी या खेळात ऑलिम्पिक खेळांमध्ये काम करणारे पवन सिंह हे एकमेव भारतीय अधिकारी आहे. याबाबत पवन सिंह म्हणाले, यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये गन फॉर गलॉरी अंतर्गत दोन खेळाडू नेमबाजीत सहभागी होत आहे. या ऑलिम्पिकसाठी नेमबाजांचा सर्वांत मोठा संघ घेऊन आपण सहभागी होत आहोत.

या स्पर्धेत आपले 21 नेमबाज 27 खेळांच्या पदकांसाठी स्पर्धेत उतरत आहेत. पहिला ऑलम्पिक हा आहे ज्यात 50 टक्के महिला खेळाडू सहभागी होणार आहे. महिला आणि पुरुष यांचे समान प्रतिनिधित्ववर भर देण्यात आला आहे. गन फॉर ग्लोरी अकादमीच्या दोन नेमबाज इलावेनिल वेलारिव्हन आणि रमिता या देखील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघाचा भाग असून महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धांमध्ये त्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

नेमबाजी मध्ये स्पर्धक वाढवण्यावर आतापर्यंत भर दिला आहे. आज आमच्याकडे एक लाख नेमबाज देशात आहे त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करत आहे. पाच हजार प्रशिक्षक तयार करण्यावर आम्ही काम करत आहे. मागील दोन वर्षात आम्ही राष्ट्रीय 96 आणि आंतरराष्ट्रीय 32 पंच तयार केले आहे. पंच हेच पुढे ज्युरी होत असल्याने अशा ज्युरी यांना स्वतंत्र प्रशिक्षक म्हणून करिअर काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. ज्युरी पदावर काम करताना प्रथम डिजिटल लक्ष्य निश्चित करून त्याची व्यवस्था पहावी लागते. गेल्या चार वर्षांत अकादमीच्या पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी 127 आंतरराष्ट्रीय पदकंवर आपले नाव कोरले आहे.

Protected Content