भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर पुन्हा चर्चेत; विमानात क्रू मेंबर्सशी वाद

prgya singh thakur

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणा-या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ठाकूर यांनी विमानातील क्रू मेंबर्सशी वाद घातला असून यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

खासदार ठाकूर या शनिवारी दिल्लीहून भोपाळला स्पाइसजेटच्या विमानाने निघाल्या होत्या. यावेळी त्या ज्या फर्स्ट क्लास विभागात बसल्या होत्या. तिथल्या काही प्रवाशांशी त्यांचा जागेवरुन वाद झाला. आपल्या जागेबाबत ठाम राहिलेल्या ठाकूर यांच्या उत्तरांवर हा प्रवाशी व्हिडिओमध्ये चिडताना दिसत आहे. चिडल्यानंतर तो ठाकूर यांना सुनावताना म्हणतो की, ‘आपल्याला थोडीशी तरी नैतिकता दाखवायला हवी. आपल्यामुळे एकाही प्रवाशाला अडचण होता कामा नये, असे आपण वागायला हवे. आपण लोकप्रतिनिधी आहात आपल्याला लाज वाटायला हवी की आपल्यामुळे ५० लोकांची अडचण होत आहे’.

प्रवाशाने अशा प्रकारे सुनावल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी त्याच्या “लाज वाटायला हवी” या वाक्यावर आक्षेप घेतला आणि त्या म्हणाल्या, तुम्ही जरा भाषा सांभाळून वापरा. त्यावर उत्तर देताना त्या व्यक्तीने म्हटले की, मी योग्यच बोलतो आहे. मी आपल्याशी प्रेमाने आणि मान ठेऊन बोलत आहे. लाज वाटणे हा कोणताही अपमानकारक शब्द नाही. त्यांनी एअरलाइनच्या माध्यमातून बुकींगही केलेलं नव्हतं. तसेच प्रज्ञासिंह यांच्यामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याचेही स्पाइसजेटने म्हटले आहे.

Protected Content