रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पतोंडी येथे आर्थिक विवंचनेतुन एका ४० वर्षीय शेतकऱ्याने विष घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की पातोंडी ता रावेर येथे किशोर श्रावण पाटील वय ४० हे सकाळी स्वता:च्या शेतात गेले व तेथे काहीतरी विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली. मयत किशोर पाटील यांना एक मुलगा असुन तो ही कर्णबधीर आहे.घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीक देखिल घटना स्थळाकडे घाव घेतली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा कयास उपस्थित नागरीक लावत होते. याबाबत रावेर पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.