यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील एसटी बस आगारातील नादुस्त व भंगार जमा झालेल्या बस गाडयांच्या व जुनाट झालेल्या बसस्थानकाच्या आधारावर आगार प्रमुखांना व त्यांच्यासह कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. महाराष्ट्र शासनाने प्रवाशांच्या या अत्यंत निगडीत असलेल्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढून आगारासाठी नवीन बसगाडयांची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशी करीत आहे .
महाराष्ट्र राज्यासह सर्वत्र शासनाच्या वतीने राज्यातील चारशेच्या वर असलेल्या बसस्थानक असून या पैकी बहुतांश बसस्थानकांच्या इमारतीचे नुतनीकरण झाले आहे. यावल तालूका आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व प्रवाशांचे दळण वळणाचे मोठे साधन असलेल्या बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम हे मंजुर असून देखील मागील सहा वर्षापासून सदरचे बांधकाम हे रखडले आहे आणि अद्याप सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे.
राज्य शासनाच्या या उदासीन व दुर्लक्षित कारभारामुळे प्रवाशी वर्गात मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय यावलच्या एसटी बस आगारात आवश्यकतेपेक्षा बऱ्याच एसटी बस वाहनांची कमतरता आहे. आगारात असलेल्या वाहनात सुमारे ८o टक्के एसटी बसगाडया या नादुरूस्त व भंगार जमा झाल्याच्या अवस्थेत आहे. आगारातील चालकांना व वाहकांना फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशा प्रसंगी बस चालकास स्वता:चे व प्रवाशांचे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे
यावल आगारातील बस गाडयांचे वारंवार ब्रेक निकामी होण्याच्या घटना समोर येत असतांना वाहक हे आपल्या कार्यकुशलतेने प्रवाशांचे जीव वाचविण्यात यशस्वी होत असून, दुसरीकडे आपल्या आगाराचे उत्पन्न वाढीसाठी आगार व्यवस्थापक हे प्रत्यनांची परिकाष्टा करीत असतांना दिसत आहे. दरम्यान राज्य शासनाने यावल आगाराशी निगडीत या बसस्थानकाची जीर्ण इमारत बांधकाम करणे व भंगार एसटी बसगाडयांच्या ठिकाणी नवीन बसगाडया देणे या दोन्ही गंभीर प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करून भविष्यात होणाऱ्या नुकसानाची घ्यावी अशी मागणी शासन प्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे .