राजदेहेर शेतकरी गटाचे संत शिरोमणी सावता माळी अभियानात सहभाग

चाळीसगाव प्रतिनिधी । राजदेहेर येथील शेतकरी गटाचे ‘विकेल ते पिकेल’ च्या धर्तीवर आधारित संत शिरोमणी सावता माळी अभियानात आज सहभाग घेतला असून अभियानांतर्गत थॉमसन सीडलेस जातीचे तीन एकरात द्राक्ष लागवड केली आहे.

कृषि तंत्रज्ञान व्यवथापन यंत्रणा आत्मा अंतर्गत तालुक्यातील राजदेहेर येथील नवनाथ शेतकरी गटाचे अध्यक्ष गोरख विठ्ठल जाधव व गटातील सदस्यांनी आज ‘विकेल ते पिकेल’ च्या धर्तीवर आधारित संत शिरोमणी सावता माळी या अभियानात सहभाग घेतला आहे. या अभियानांतर्गत थॉमसन सीडलेस जातीचे द्राक्ष तीन एकरात लागवड केली आहे. २५ टन उत्पादन होतील असा अंदाज वर्तविला जात आहे. गटाचे अध्यक्ष यांनी शेवगा 8 एकरात, डाळिंब 5 एकरात, मोसंबी 5 एकरात व  भाजीपाला 8 एकरात लागवड केली आहे. आधुनिक पद्धतीने यंत्र सामुग्रीचा वापर करून शिंदी गावात ३० एकरात द्राक्षे लागवड केली आहे. यावेळी पाहणी करताना मंडळ कृषी अधिकारी विश्वनाथ सूर्यवंशी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा)चे ज्ञानेश्वर पवार, कृषि सहाय्यक तुळशीराम पवार आदी उपस्थित होते. चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत 103 विक्री केंद्रांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, प्रकल्प उपसंचालक कुर्बान तडवी, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे (चाळीसगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.

Protected Content